पत्रव्यवहार
आजच्या सुधारक च्या ऑगस्ट १९९५ च्या अंकाच्या मलपृष्ठावर पंडिता रमाबाईंचा एक उतारा छापला आहे. त्यात बाई म्हणतात, “हिंदूधर्माच्या श्रेष्ठ तत्त्वज्ञानाच्या बाह्य मोठेपणावर भाळून त्याचे गोडवे गाणाच्या माझ्या पाश्चात्य मित्रांना मी विनंती करते की हिंदुतत्त्वज्ञानावरील व्याख्याने ऐकून भारून जाऊ नका. ह्या हिंदुबुद्धिमत्तेच्या स्मारकाखालचे चोर – दरवाजे उघडून बघा, म्हणजे ह्या उदात्त तत्त्वज्ञानाचे व्यवहारातले रूप दिसून येईल”. …